Government decision : देशभरातील 70 वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी. केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजनेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. देशभरातील 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Government decision : मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वृद्धांसाठी मोफत आरोग्य सेवांचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या या निर्णयाने वृद्धांची आरोग्याची हेंडसाळ थांबणार. या योजनेच्या माध्यमातून देशातील लाखो वृद्धांना दिलासा मिळणार आहे, कारण उपचारांच्या वाढत्या खर्चामुळे अनेकदा त्यांना योग्य उपचार मिळत नव्हते.
आयुष्यमान भारत योजना आधी चालू होती या योजनेअंतर्गत गरीब आणि दुर्बल घटकांसाठी आरोग्याची काळजी घेणारी महत्त्वाची योजना होती. मात्र, केंद्र सरकारच्या नवीन निर्णयामुळे आता 70 वर्षांवरील सर्व वृद्धांना ही सुविधा मिळणार आहे.
या योजनेत या घटकांचा समावेश
या योजनेमुळे 70 वर्षांवरील नागरिकांना रुग्णालयात (Hospital) दाखल होणे, ऑपरेशन (operation), औषधोपचार (Treatment) आणि इतर सर्व वैद्यकीय सेवांचा (Medical services) समावेश असेल. या योजनेमुळे देशातील वृद्ध नागरिकांना केवळ उपचारासाठी नकदी पैसे भरावे लागणार नाहीत, तर त्यांना त्यांच्या वाढत्या वयासोबत येणाऱ्या आरोग्यविषयक समस्येवर सहज उपचार मिळण्याची संधी मिळेल.
केंद्र सरकारने देशातील नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे त्यानुसार हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे या निर्णयामुळे कोणताही ताण न घेता वृद्धांना उपचारासाठी विना आर्थिक ताण न येता सहजपणे उपचार घेता येणार आहे.