आता राज्यातल्या शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न (CBSE Pattern) लागू करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पालकांचा आपल्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या शाळेत टाकण्याचा कल वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशांचे प्रमाण कमी होत आहे.
या बाबीचा विचार करून शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
पुढच्या वर्षीपासून सीबीएससी चा अभ्यासक्रम आता राज्यातील शाळांमध्ये शिकवला जाणार आहे. बोर्ड एसएससी राहणार आहे. माध्यम मराठी किंवा सेमी इंग्लिश राहणार. सीबीएससी चा अभ्यासक्रमात ज्या परीक्षा होतात. विविध शिक्षण क्षेत्रात स्पर्धा परीक्षा होतात.
CBSE Pattern : स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी यशस्वी होण्याचा तुम्हाला वाढणार
त्यात सीबीएससी चा अभ्यासक्रम असतो त्यामुळे सीबीएससी पॅटर्न मध्ये शिकलेल्या विद्यार्थी यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे. तो जर अभ्यासक्रम आपली मुलं शिकली तर नैसर्गिक रित्या त्यांना मदत होईल ते अधिक ठिकाणी सिलेक्ट होऊ शकतील.
पुढील वर्षी सीबीएससी चा अभ्यासक्रम स्वीकारत नाही तर सीबीएससी च्या पुढे जाऊन आम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम अनिवार्य करणार आहोत.
चांगल्या शिक्षणासाठी सीबीएससी शाळांकडे पालकांचा व विद्यार्थ्यांचा कल वाढतोय. राज्यातल्या शाळेतही सीबीएससी चा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. स्पर्धा परीक्षेत या निर्णयामुळे मुलं मागे पडणार नाहीत. पालकांचा व सरकारचा असा विचार आहे. तर इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. पुढील वर्षापासून शाळांमध्ये राज्याच्या बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएससी चा अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात होणार आहे.