काही दिवसांपासून मध्यप्रदेशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5789 रुपये भाव मिळणार असल्याचा एक फेक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या फेक पत्रकाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील शेतकऱ्यांनी देखील 5789 रुपयांच्या भावाची मागणी केली आहे. परंतु, मध्यप्रदेश सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की, हे पत्रक पूर्णपणे खोटे आहे आणि असे फेक पत्रक व्हायरल करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
सोयाबीन हमीभावाची सत्यता
सध्याच्या स्थितीत, खरीप हंगाम 2024 साठी केंद्र सरकारने सोयाबीन साठी 4892 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. या भावाने खरेदी करण्याची तयारीही सुरू केली आहे. मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांसाठी देखील या हमीभावाची मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांचे सोयाबीन नाफेड च्या माध्यमातून या हमी भावाने खरेदी केले जाणार आहे.
शेतकऱ्यांची मागणी
देशभरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला 6000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी रास्त मागणी केली आहे. मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलनादरम्यान ही मागणी पुढे करण्यात आली होती. शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेता, सध्याचा 4892 रुपये हमीभाव वाढवून केंद्र सरकारने 6000 रुपयांपर्यंत नेण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा व्यक्त केली आहे.